सावित्रीबाई फुले –
१ जानेवारी १८४८ रोजी जोतीरावांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मागासवर्गीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई वयाच्या १७ व्या वर्षापासून त्या शाळेत विनावेतन शिकवू लागल्या. त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. १८५१ मध्ये फुले दांपत्याने चिपळूणकरांच्या वाड्यातील आणि रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना केली. १० सप्टेंबर १८५३ या दिवशी जोतीरावांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह ‘महार मांग इ. लोकांस विद्या शिकविण्याकरिता मंडळी’ या नावाची संस्था स्थापन केली.
१८६३ साली जोतीराव-सावित्रीबाईंनी गंजपेठेतील राहत्या घरात विधवा स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन ‘बालहत्या प्रतिबंधकगृहा’ची स्थापना केली. १८८४ पर्यंत अनेक भागांतून सुमारे ३५ असहाय स्त्रिया तेथे आल्या. अशा स्त्रियांची बाळंतपणे सावित्रीबाई स्वतः करीत. त्यांतीलच एका काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा यशवंत या मुलाला फुले दांपत्याने दत्तक घेतले. पुढे तो वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झाला.
जोतिबा फुले यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. या कार्यात सावित्रीबाईंची खंबीर साथ त्यांना लाभली.
२८ नोव्हेंबर १८९० रोजी जोतीबांचा मृत्यू झाला. त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास यशवंतला नातेवाईकांनी विरोध केला, तेव्हा सावित्रीबाईंनी जोतीबांच्या पार्थिवाला अग्नी दिला. हे एक क्रांतिकारक पाऊलच म्हणायला हवे. जोतिबांनी मृत्यपत्रात ‘माझी पत्नी सावित्रीबाई माझे कार्य निश्चितच पुढे नेईल’ असे म्हटले होते. त्याप्रमाणे जोतीबांनंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाचे काम चालूच ठेवले. १८९३ साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
१८७६-७७ आणि १८९६ या काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला होता. त्या वेळी सावित्रीबाईंनी गोरगरिबांना खूप मदत केली. सत्यशोधक समाजाद्वारे ठिकठिकाणी अन्नछत्रे उघडून सुमारे २००० मुलामुलींची भोजनाची व्यवस्था त्यांनी केली.
1897 साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. गरिबांना औषध आणि सेवा मिळणे.
-गायत्री भालेराव
एम.ए(इतिहास),एम.ए(इंडॅालॅाजी),एम.फिल.(इतिहास)

Very Good Information!